बुधवार, १९ ऑगस्ट, २००९

बंड


आज बंड करायचाय मला तुझ्याविरुद्ध
होय फोडून काढायचय तुला चाबकांनी
पिचलेल्या मना खुन करायचाय तुझा
पुन्हा एकदा द्यायचाय जन्म क्रांतीला
तोडून द्यायची आहेत सारी खोटी बंधने
पुन्हा उधळायचय मला बेभान माजून
घडवायचय नवीन जग पुन्हा एकदा
माणूस बनवायचाय मला या माकडांतून
शिकवायचीय त्याला पुन्हा एकदा नैतिकता
ठासून भरायचीय मला त्याच्यात हिंमत
पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी काळाच्यापुढे
बनवायचय त्याला सक्षम पोलादासारखं
पुन्हा एकदा बंड करण्यासाठी तुझ्याविरुद्ध

----बाळराजे

२ टिप्पण्या:

  1. कविता अगदी मनाला भीड़नार्या आहेत...
    आनी वाळवांट ही कथा ही अप्रतिम आहे ...
    असेच याला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न करा ...

    उत्तर द्याहटवा

Powered By Blogger